HomeShopReviewsBlogAboutContact
Back to Recipes
बिना कांदा–लसूण झणझणीत भरली वांगी Recipe

3 February 2026

बिना कांदा–लसूण झणझणीत भरली वांगी Recipe


 

🌶️ बिना कांदा–लसूण झणझणीत भरली वांगी 

🥗 साहित्य

फोडणीसाठी :


👩‍🍳 कृती

  1. सर्वप्रथम वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्या. देठ काढू नका.
    वांग्यांना खालील बाजूने चार काप द्या, पण पूर्ण वेगळी होणार नाहीत याची काळजी घ्या.

  2. आता भरावण (बॅटर) तयार करूया.
    एका भांड्यात भाजलेले व वाटलेले तीळ, सुके खोबरे, जिरे, मिरची पूड, हळद, धणेपूड, गरम मसाला, मसाला चटणी, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घ्या.
    थोडे थोडे पाणी शिंपडत घट्ट पण मऊ बॅटर तयार करा.

  3. तयार बॅटर वांग्यांच्या कापांमध्ये नीट भरून घ्या.

  4. पातेल्यात तेल गरम करा. तेल चांगले कडले की मोहरी व जिरे घाला.
    फोडणी फुटल्यानंतर उरलेले बॅटर तेलात घालून मसाला छान परतून घ्या.

  5. मसाला तेल सुटेपर्यंत परतल्यावर भरलेली वांगी पातेल्यात ठेवा.
    झाकण ठेवून मध्यम आचेवर 10–15 मिनिटे शिजवा.

  6. मध्ये मध्ये थोडे थोडे पाणी शिंपडत वांगी उलटवा, जेणेकरून वांगी जळणार नाहीत आणि आतपर्यंत मऊ शिजतील.

  7. वांगी छान शिजून मसाल्यात मुरली की गॅस बंद करा.

झाली आपली झणझणीत, बिना कांदा–लसूण महाराष्ट्रीयन भरली वांगी तयार!